'राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते'

भारत नागणे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली.

पंढरपूर : ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा टोला जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी लगावला.

तानाजी सावंत आज विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. विठ्ठल दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले .

राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह काँगेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीन हटवा आंदोलनाची हाक दिली आहे. त्याच्या या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता मंत्री सावंत यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांचा नामोल्लोख न करता टीका केली.

सत्तेशिवाय बैचेन असलेले काही नेते ईव्हीएम मशीनवर शंका घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोणताच प्रश्न नाही. नैराश्येतून एकत्रित आलेले हे नेते सरकार विरोधात एकत्रित आल्याचेही मंत्री सावंत यांनी म्हटले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महावीर देशमुख आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Tanaji Sawant attacks Raj Thackeray and Ajit Pawar on EVM