esakal | संजय राऊतांनी सांगितलेली "ती' कन्नड शाळा सोलापुरात
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut interviewed in Belgaum

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची बेळगाव सार्वजनिक वाचनालयात होणाऱ्या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मुलाखतीमध्ये सुरुवातीलाच त्यांनी सोलापूर व लातूर जिल्ह्यात असलेल्या कन्नड माध्यमाच्या शाळांना सरकार अनुदान देत असल्याचे म्हणाले.

संजय राऊतांनी सांगितलेली "ती' कन्नड शाळा सोलापुरात

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : कन्नड माध्यमातील शाळा टिकल्या पाहिजेत, म्हणूनच त्यांना राज्य सरकार अनुदान देत आहे, असे सांगत संजय राऊत यांनी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांमधील शाळांचा उल्लेख केला. कन्नड भाषेला आमचा विरोध नसल्याचे सांगत कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांचे आम्ही स्वागत करत असल्याचेही ते म्हणाले. 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची बेळगाव सार्वजनिक वाचनालयात होणाऱ्या मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मुलाखतीमध्ये सुरुवातीलाच त्यांनी सोलापूर व लातूर जिल्ह्यात असलेल्या कन्नड माध्यमाच्या शाळांना सरकार अनुदान देत असल्याचे म्हणाले. कन्नड भाषेला आमचा विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कन्नड भाषेच्या शाळांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सरकार अनुदान देते. कॉंग्रेसचे नेते मलिकार्जुन खरगे हे देखील कर्नाटक राज्यातीलच आहेत. मात्र, आम्ही त्यांचे स्वागतच करतो. अनेकदा ते मराठीतच बोलतात, असे ते म्हणाले. सोलापूर शहरात महापालिकेच्या कन्नड माध्यमाच्या तीन शाळा आहेत. 
बेळगाव येथे सार्वजनिक वाचनालयाच्या नाथ पै व्याख्यानमालाच्या उद्‌घाटनासाठी ते बेळगावात आले होते. दरम्यान त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांचे विमानतळावर स्वागत केले.