शिवसेनेच्या वानकरांचा मार्ग मोकळा ; पूर्वीप्रमाणेच निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

भाजपने सतेच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून रडीचा डाव खेळूला होता. मात्र, भाजपला हे पचले नाही सत्याचा वाली असतोच आणि आमचा विजय सत्याचा विजय आहे. परिवहन पाठोपाठ स्थायी समितीही शिवसेनेकडे अाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेणार आहे. 

- महेश कोठे , विरोधी पक्षनेता

सोलापूर : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक पूर्वीप्रमाणेच राबवावी, असे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे शिवसेनेचे गणेश वानकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सभापतिपदासाठी वानकर यांच्यासह भाजपकडून राजेश्री कणके यानी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर अनुमोदकाची सही नाही. त्यामुळे वानकर यांची बिनविरोध निवड निशचित होती. याचदरम्यान भाजपचे सुभाष शेजवाल यांनी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांच्या हाती असलेला कागद पळविण्यात आला. त्यामुळे अर्ज भरण्याची संधी मिळाली नाही अशी हरकत घेत शेजवाल न्यायालयात गेले होते. त्यावर आज सुनावणी होऊन अर्ज दाखल केल्याप्रमाणे कार्यवाही करावी असा आदेश न्या. अभय ओक यांनी दिला.

सोलापूर महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणुकीचा अर्ज दाखल करताना शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. या गोंधळाच्या भरात भाजपच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही तर एका उमेदवाराचा अर्ज पळवून नेला होता.यामुळे ही निवडणूक रद्द करावी. अशी मागणी भाजपाने पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉ भारुड यांनी विभागीय आयुक्तांना सर्व माहिती दिली होती. विभागीय आयुक्तांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगून निवडून रद्द करण्याचे आदेश पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना दिले होते. त्यानुसार डॉ. भारुड यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती. पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश होते. त्यानुसार मंगळवार दिनांक 6 मार्च रोजी उमेदवारी अर्जही दाखल करण्यात येणार होते.

मात्र विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी मुंबई उच्य न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती, ही निवडून प्रक्रिया बेकायदेशीर असून पूर्व नियोजना प्रमाणेच निवडणूक प्रक्रिया घ्यावी अशी मागणी केली.

6 मार्च रोजी झालेल्या सुनावणीनंतर तारीख पे तारीख सुरू होती. यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर  मुंबई उच्यन्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी.10 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती अभय ओक यांनी शिवसेनेचे गणेश वानकर यांच्या बाजूने निकाल देऊन 6 मार्चची निवडणूक प्रक्रिया  बेकायदेशीर आहे. यामुळे पूर्व नियोजनानुसारच निवडणूक घ्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी दिले आहे.

पूर्व नियोजनानुसार दाखल केलेल्या अर्जावर भाजपच्या राजश्री कणके यांच्या अर्जावर अनुमोदकची सही नसल्यामुळे कणके यांचा अर्ज छाननीत बाद होणार आहे. यामुळे शिवसेनेचे गणेश वानकरच स्थायी समितीचे सभापती होणार हे आता निश्चित झाले आहे. यामुळे भाजपला ही मोठी चपराक आहे.

दरम्यान, भाजपने सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. मात्र सत्याचा वाली हा असतोच आमचा न्यायालयावर विश्वास होता.आमचा हा  सत्याचा विजय असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक तथा उमेदवार गणेश वानकर यांनी सांगितले.

Web Title: Shivsena Vankar Election Procedure