

‘कृषी’ विभागातील शिपायावर तलवार हल्ला
esakal
Jat Sangli Agriculture Department : जत उपविभागीय कृषी कार्यालयाला रात्री गस्त घालणाऱ्या शिपायावर पाच चोरट्यांनी तलवार हल्ला कला. गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. बाळू लक्ष्मण मोरे (वय ५५, मुचंडी, ता. जत) असे जखमी शिपायाचे नाव आहे. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मोरे यांच्याकडील मोबाईल, गळ्यातील चेन व अंगठी चोरट्यांनी पळवून नेले. शासकीय कर्मचाऱ्यावर व तो रात्री हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.