
सांगलीत तरुणीस जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
दोषीला १० वर्षांची शिक्षा: महाविद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राहुल मानसिंग चव्हाण (रा. बोरगाव) यास १० वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला.
घटना २०२० मधील: २२ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार केला; पीडिता गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
न्यायालयाचा निर्णय: जिल्हा सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी शिक्षा सुनावली; दंडाची १६ हजारांची रक्कम पीडितेस देण्याचा आदेश दिला.
Crime in Sangli : महाविद्यालयात सोडण्याच्या बहाण्याने तरुणीस जबदरस्तीने दुचाकीवर बसवून तिला जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून बोरगावच्या तरुणास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी ही शिक्षा सुनावली. आरोपी राहुल मानसिंग चव्हाण (वय २४, रा. झरोना मळा, बोरगाव, ता. तासगाव) असे त्याचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे - साटविलकर यांनी काम पाहिले.