
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन पुरवठा केल्याप्रकरणी सांगलीतील काही जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय इंजेक्शन दिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नशाबाजाराची साखळी सांगलीतून चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘नशामुक्त सांगली’साठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उघडलेल्या प्रशासकीय मोहिमेसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे.