
दोघा मित्रांकडून तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून
esakal
Sangli Tasgaon Crime : नागाव निमणी (ता. तासगाव) येथे किरकोळ भांडणाच्या वादातून चेतन ऊर्फ बुलट्या दुर्ग्या पवार (वय ४६) याचा त्याच्याच दोन मित्रांनी कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा संशयितांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसांत हा दुसरा खून झाला.