कडेगाव तहसील कार्यालयावर शोले स्टाईल आंदोलन

नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी
कडेगाव तहसील कार्यालयावर शोले स्टाईल आंदोलन
कडेगाव तहसील कार्यालयावर शोले स्टाईल आंदोलन

कडेगाव (सांगली) : कडेगाव नगरपंचायतीमध्ये सुरु असलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते डी. एस.देशमुख व वंचित आघाडीचे जीवन करकटे हे तहसील कार्यालय इमारतीवर चढले असून उडी मार आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलकांनी उडी मारू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु भ्रष्ट कारभाराची चौकशीचे आदेश लेखी दिले नाही तर थोड्याच वेळात तहसील इमारतीवरून उडी घेणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलन स्थळावर लोकांनी मोठी गर्दी केली असून आंदोलनाने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली असून तातडीच्या बैठकीचे व चर्चेचे नियोजन करण्यात येत आहे.

शहरात हाय मास्ट लॅम्पचे काम एका कंपनीला दिले आहे. या लॅम्पची देखभाल दुरुस्तीची सात वर्षाची जबाबदारी कंपनीची असून देखील येथील अनेक लॅम्प बंद अवस्थेत आहेत. नगरपंचायत याबाबत कार्यवाही करताना दिसत नाही. कडेगाव मधील बालोद्यान कोणत्या सिटी सर्व्हे गटात मंजुर केले व कोठे उभारले आहे याचीही माहीती द्यावी.

कडेगाव तहसील कार्यालयावर शोले स्टाईल आंदोलन
बॉडी बिल्डर मनोज पाटीलचे आई-वडील राज ठाकरेंच्या भेटीला

ओढ्याकाठी हे बालोद्यान उभारले असुन या बालोद्यानाला ओढ्याच्या पुराच्या पाण्याचा फटका बसत असुन या छोट्याशा जागेत लहान मुलांना खेळण्यास वाव नाही. तसेच या बालोद्यानामध्ये उभारलेले साहीत्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून ते साहीत्य मोडकळीस आले आहे.या साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

वॉटर एटीएम टेंडर होवुनही झालेले नाहीत.त्यामुळे शुद्ध पाणी लोकांना विकत घ्यावे लागत आहे. याबाबत मागणी व निवेदन देऊनही योग्य ती कार्यवाही झाली नाही.तेव्हा नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी व वंचित आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयावरुन उडीमार आंदोलन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com