esakal | Sangli | बाजारपेठेत खरेदीची धूम
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली : बाजारपेठेत खरेदीची धूम

सांगली : बाजारपेठेत खरेदीची धूम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : दीड वर्षांच्या कोरोना संकटानंतर बाजारपेठ आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याला उद्या खरेदीची धूम असणार आहे. सोने, चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर बाजाराला मोठ्या उलाढालीची अपेक्षा आहे. वाहन बुकिंगसह सर्वच शोरूममध्ये गेल्या आठवडाभरात चौकशीसाठी गर्दी आहे. ती खरेदीत परावर्तित होईल, असा विश्‍वास बाजारपेठेतून व्यक्त झाला आहे.

मार्च २०२० पासून जगभरात कोरोना संकटाने बाजारपेठ कोलमडली होती. व्यापाराचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून व्यापारी अजून सावरला नाही. त्यात महापुराचे संकट आल्यामुळे कंबरडे मोडले. हे सगळे मागे सारून नव्याने बाजार सावरत आहे. दसरा आणि दिवाळीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळेल आणि गेल्या दीड वर्षांपासून थांबलेल्या मोठ्या उलाढाली सुरू होतील, असा विश्‍वास व्यापारी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा: खामगाव : निर्माणाधीन रस्‍त्‍यावरील अपघातांचे भय संपेना

विशेषतः वाहन विश्‍वाला पुढचा महिना बुस्टर देणारा ठरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या बुकिंगला मिळणारा प्रतिसाद उत्तम असून, सोने दहा ग्रॅम दर ४७ हजार ७०० रुपये, तर चांदी किलो दर ६३ हजार रुपये आहे. सोन्याचा दर ५५ हजारांवरून खाली आला. तो आता स्थिर झाला आहे. लग्नसराई गतीने सुरू होणार आहे.

सोन्याचे दर स्थिरावले आहेत, ही जमेची बाजू आहे. गेल्या रविवारपासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे. डिझाईन पाहणे, खरेदीला प्रतिसाद खूप आहे. एक-दीड वर्षानंतर बाजारपेठ पूर्ववत होताना दिसत आहे. दिवाळीनंतर लग्नाचा धूमधडाका असेल. त्याची खरेदीही आता सुरू झाली आहे. दसरा, दिवाळी निश्‍चितच खरेदीचा बुस्टर देणारी असेल.

- सिद्धार्थ गाडगीळ, पीएनजी सराफ पेढी

गेल्या दीड वर्षात सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. त्यातून सावरून पुढे जाण्याचा काळ सुरू झाला आहे, असे दिसत आहे. दसरा, दिवाळी नक्कीच लाभदायी असेल. लोकांचा वाहन खरेदीकडे कल पुन्हा वाढताना दिसत आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे.

- श्रीकांत तारळेकर, शोरूम

loading image
go to top