41 दाखवा आठ देतो...

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 1 December 2019

  • महापालिकेतील महाआघाडीची जुळवाजुळव सुरू
  • भाजपच्या 49 नगरसेवकांना नेणार अज्ञात स्थळी 
  • भाजपच्या सात नगरसेवकांचे बंड थंड झाल्याची चर्चा 

सोलापूर : महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी महाआघाडीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. दरम्यान, एमआयएमने आपल्या भूमिकेत बदल केला असून, आम्हाला कोणतेही पद नको, पण 42 नगरसेवक दाखवा, आमचा बिनशर्त पाठिंबा घ्या, असे धोरण निश्‍चित केले आहे. 

हेही वाचा : पोलिसांच्या हाताला हिसका देऊन सांगोल्या आरोपी फरार 

उपमहापौरपदाची उमेदवारी राजेश काळे यांना दिल्याच्या कारणावरून नाराज झालेल्या भाजपमधील सात नगरसेवकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्याची संधी साधत महाविकास आघाडीने जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपच्या 49 नगरसेवकांना महापौर निवडणुकीच्या दिवसापर्यंत अज्ञात स्थळी नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी सर्व नगरसेवक रवाना होणार होते, मात्र योग्य नियोजन न झाल्याने दौरा रद्द करण्यात आला. 

महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांची भेट घेतली. त्या वेळी आम्हाला महापौर किंवा उपमहापौर यापैकी कोणतेही पद नको. महाविकास आघाडीकडे 42 नगरसेवक असल्याचे दाखवा, आमचे एमआयएमचे आठ नगरसेवक तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतील, असा प्रस्ताव श्री. खरादी यांनी ठेवला आहे. त्यामुळे 42 नगरसेवक दाखविण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पडली आहे. शिवसेना 21,

कॉंग्रेस 14, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
चार असे एकूण 39 नगरसेवक महाविकास आघाडीकडे आहेत. माकप, बसप व वंचितने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. या सर्वांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर आघाडीकडे 44 नगरसेवक होतील, तरीसुद्धा भाजपपेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी आणखी किमान सहा मतांची गरज भासणार आहे. हे पक्ष तटस्थ राहिले तर मात्र एमआयएमचा पाठिंबा घेतला तरी आघाडीकडे 47 मते होतील. 

हेही वाचा : 

यामुळे होणार नियोजन कार्यालय लोकाभिमुख

 भाजपचे 49 नगरसेवक आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपच्या श्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रत्येकी एक सदस्य असलेल्या बसप आणि माकपच्या सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तरी भाजपचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र त्याच वेळी बसप व माकपने पाठिंबा दिला तर एमआयएमचे आठ सदस्य त्यांच्या पाठीशी उभे राहतील. अशा वेळी दोन्हीकडे प्रत्येकी 49 मते होतील आणि मग वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कॉंग्रेसच्या श्रीदेवी फुलारे काय भूमिका घेणार याबाबतही उत्सुकता आहे. 

बंडोबा झाले थंडोबा 
राजेश काळे यांना उमेदवारी दिल्याच्या कारणावरून राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या सात नगरसेवकांचे बंड थंड झाल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बंड निवळल्याचे सांगण्यात आले. तथापि, श्री. वल्याळ यांच्याशी संपर्क साधला असता, आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show 41 gives 8