मंगळवेढ्याच्या नगराध्यक्ष अरुणा माळींना कारणे दाखवा नोटीस

aruna mali.jpg
aruna mali.jpg

मंगळवेढा : नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अरुणा माळी यांना कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी बजावली आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 58 नुसार कर्तव्य पार पाडण्यास सक्षम व समर्थ नसून नगराध्यक्षा पदाचा अवमान करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पदावरुन कमी करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

याबाबत त्यांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीमध्ये म्हटले आहे की, गौरी शंकर बुरकूल यांनी 1 नोव्हेंबर 18 ला केलेल्या तक्रारीमध्ये पती नगरपालिकेच्या कामात पतीचा हस्तक्षेप करत असून त्यांना पाठीशी घालणे, विविध योजनेतून हाती घेतलेल्या विकास कामाच्या देयक प्रमाणावर स्वाक्षरी न करणे, मुख्याधिकारी व विभाग प्रमुख हे निविदा मंजूर शिफारस करीत असताना या निविदा नामंजूर करणे, महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 81(3) मधील खंड 2 मध्ये विदिनिष्ठ केलेल्या कालावधीत सभा भरण्यात कसूर करणे, नगरपरिषद मिनिट बुकात नियमबाह्य स्वतः बदल करणे, नातेवाईकाच्या फायद्यासाठी नगरपरिषद आर्थिक नुकसान करून पदाचा गैरवापर करणे, अशा अनेक बाबी पाहता अध्यक्ष म्हणून हे गैरवर्तन व दुर्लक्ष करणारे आहे. त्यामुळे नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 58 नुसार अध्यक्षपदाचे कर्तव्य पार पाडण्यास कर्तव्य पार पाडण्यास सक्षम व समर्थ नाही व नगराध्यक्षपदाच्या प्रतिमेश आपण अवमान करण्यात असल्याचे दिसून येत आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसची खुलासा 15 दिवसाच्या आत सादर करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीसमध्ये बजावण्यात आलेली आहे.


''नगध्यक्षपदाचा कारभार करण्यास मी स्वतः सक्षम असल्याने पतीच्या हस्तक्षेपाचा संबंध येत नाही. पती-पत्नीचे नाते घरापुरते मर्यादित असून नगरपालिकेत येताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून येत आहे. त्यावर मी बंदी घालू शकत नाही. माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग करून त्यांनी कुठल्या कर्मचाऱ्याला दमबाजी किंवा त्याचा वापर केला असेल तर दाखवावे. बुरकुल हे नगरसेवक नसून माझ्या विरोधात राजकीय देशातून तक्रार केली. कच्च्या मिनिट बुकात दुरूस्ती सुचवली म्हणजे खाडाखोड होत नाही पक्क्या प्रोसिडिंग मध्ये कोणताही बदल किंवा खाडाखोड केली नाही.''
- अरुणा माळी, नगराध्यक्ष मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com