VIDEO : दिगंबर...दिगंबरा...च्या गजराने नृसिंहवाडी दत्तमय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

दुपारी साडेबाराला महापूजा केल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्सव काळामध्ये दुपारी पवमान पंचसूक्त पठण नंतर कीर्तन झाले. सायंकाळी ठीक पाच वाजता मुख्य मंदिरातून जन्मकाळ सोहळ्यास प्रारंभ झाला

नृसिंहवाडी ( कोल्हापूर ) - दिगंबर...दिगंबरा...च्या अखंडित गजरात...लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये..मंगल आणि धार्मिक वातावरणामध्ये सायंकाळी ठिक पाच वाजता दत्तमंदिरामध्ये जन्म काल सोहळा मोठ्‌या भक्तिभावाने ब्रह्मवृंदच्या साक्षीने देखण्या सोहळा संपन्न झाला.

यावेळी दत्तमंदिर परिसरांमध्ये कृष्णा काठावर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. दत्त देवस्थान व ग्रामपंचायत यांच्यावतीने या सोहळ्याचे नेटकं नियोजन करून भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंदिरामध्ये दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने पार पडले. पहाटे चार वाजता मंदिर परिसरामध्ये ब्रह्मवृंदा मार्फत भूपाळी गणपतीपूजन काकड आरतीने गावाची पहाट उगवली. त्यानंतर पुरुषसुक्त षोडशोपचार पूजा विधी करून त्यानंतर पादुकयावर कृष्णा नदीचा जलाभिषेक पंचामृत अभिषेक व फळांचा स्नान घालण्यात श्री आले. त्यानंतर साडेसात ते बारा या वेळेत भाविकासाठी अभिषेक करून पंचामृत पूजा, लघुरुद्र विधी केला गेला.

हेही वाचा - कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे असे आहे आरक्षण 

दुपारी साडेबाराला महापूजा केल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उत्सव काळामध्ये दुपारी पवमान पंचसूक्त पठण नंतर कीर्तन झाले. सायंकाळी ठीक पाच वाजता मुख्य मंदिरातून जन्मकाळ सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी उत्सवमूर्ती सजविलेल्या पालखीतून नारायण स्वामींच्या मंदिरापासून मुख्य मंदिरात दिगंबराच्या गजरात ब्रह्मवृंदांनी मोठया भक्ती भावाने आणण्यात आली. यावेळी भाविकांनी श्री चा पाळणा पाहण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती. कीर्तनानंतर श्रींचा जन्मकाळ सोहळा दिगंबरा दिगंबरा च्या गजरामध्ये संपन्न झाला.

हेही वाचा - फोन आला, तुमचे खाते बँक बंद झाले आहे, अन्... 

जन्माच्यावेळी त्यांच्यासमोर ब्रह्मवृंदाकडून मनोभावे पाळणा म्हणण्यात आला. त्यानंतर पाळण्याचे पाळीदार मानकरी उदय व प्रशांत पुजारी यांच्या घरी भक्तिभावना नेण्यात आला. या दत्त जन्मकाळ सोहळा व पाळण्याचे धार्मिक सोहळ्याने एक वेगळी धार्मिक उंची या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दत्त मंदिराच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर सभामंडप उभारण्यात आला होता. भाविकांनी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शन व्हावे, यासाठी बॅराकॅटची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकासाठी तीन रंगाचे नियोजन करण्यात आलं होतं. अनेक पद्धतीने दत्त हायस्कूलचे विद्यार्थी ध्वनिक्षेपकावरून माध्यमातून महत्त्वपूर्ण उपदेश करत होते.

ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री खिरुगडे व गुरूदास खोचरे यांच्या पुढाकाराने भाविकांसाठी वीज, पाणी आरोग्य, स्वच्छता यांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच पोलीस चौकी आरोग्य केंद्र दोन चाकी, चार चाकी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड मिरज सांगली महामंडळाच्या वतीने जादा गाड्‌या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Datta Jayanti Celebrates In Narsinhwadi