भंडाऱ्याच्या उधळणीत रंगला श्री कामसिद्ध बंधू-भेटीचा सोहळा

खुपसंगी (ता.मंगळवेढा ) येथे श्री कामसिध्द बंधुभेटीच्या सोहळ्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.
खुपसंगी (ता.मंगळवेढा ) येथे श्री कामसिध्द बंधुभेटीच्या सोहळ्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.

आंधळगाव - 'कामसिध्दाच्या नावने चांगभले....' या जयघोषाने सारा आसमंत निनादून निघाला होता. यावेळी धनगरी ढोल, मुक्तहस्ताने होणारी भंडाऱ्याची उधळणीत अशा भक्तीमय वातावरणात खुपसंगी (ता.मंगळवेढा) येथे श्री.कामसिध्द बंधू-भेटीचा नयनरम्य सोहळा मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. 

भेट सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातील सावे व शिरभावी आणी मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी,खोमनाळ, हिवरगाव तसेच  ह्या पाच गावच्या पालख्या खुपसंगीच्या गावच्या  बंधूभेटीला दाखल झाल्या होत्या.

या बंध-भेटीच्या सोहळ्याकरिता खुपसंगी, सावे, शिरभावी, खोमनाळ, हिवरगाव, तळसंगी, पाठखळ, गोणेवाडी, जुनोनी, आंधळगाव , गणेशवाडी, लेंडवेचिंचाळे, मंगळवेढा व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने व भक्तीभावाने उपस्थित होते.

श्री. कामसिध्द बंधू-भेटीच्या सोहळ्याची जय्यत तयारी श्री क्षेत्र खुपसंगी येथील यात्रा कमिटीकडून करण्यात आली होती . दुसऱ्या दिवशी  बुधवारी दि. ३० रोजी दिवसभर गजी ढोल व देवास नैवद्य दाखवले जातात .रात्री ९ वाजता आर्केस्ट्रा मधुर कोल्हापुर यांचा कार्यक्रम होणार असुन. गुरुवार दि.३१ रोजी श्री क्षेत्र खुपसंगी येथील मोठ्या बंधूस भेटावयास अलेल्या लहान भावंडाना दुपारी ३.०० वाजता मोठ्या भक्ती भावाने व जल्लोष्यात निरोप दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com