श्री खंडोबाचा विवाह सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अतिशय भक्तीपुर्ण व उत्साही वातावरणात श्रीं चा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर फटाके फाेडण्यात आले. देवस्थानकडून विविध मानकर्यांना मानाची रक्कम देण्यात आली.

दहिवडी (जि. सातारा) : श्री क्षेत्र मलवडी येथील श्री खंडोबाचा विवाह सोहळा नाग दिव्यांच्या शुभ मुहूर्तावर रविवारी रात्री अकरा वाजून वीस मिनीटांनी देवस्थानचे विश्वस्त, मानकरी, सालकरी, भाविक-भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रेस श्रींच्या हळदी सोहळ्याने सुरुवात झाली. 27 नोव्हेंबर रोजी देव दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर रात्री 9:20 मिनिटांनी श्रीं च्या हळदी लागल्या. रविवारी ता. एक डिसेंबर रात्री श्रीं चा विवाह सोहळा झाला. या निमित्त मंदीर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. त्यापुर्वी दहा वाजता सनई-चौघडे व वाद्यवृंदाच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजतगाजत श्रीं चा बस्ता बांधण्यासाठी नामदेव मुळे यांच्या कापड दुकानात गेले. कपडे खरेदी केल्यानंतर सर्वजण मंदिरात आले. पुजार्यांनी विधीवत श्री खंडोबा व श्री म्हाळसा यांना नवीन पोशाख परिधान केला.

अवश्य वाचा - #MondayMotivation एकीचे बळ

रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राम्हण व जंगम यांनी सुरुवात केली. सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. रात्री ठिक अकरा वाजून वीस मिनिटांनी श्रीं च्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपात अशा दोन ठिकाणी श्रीं च्या मुर्ती आहेत. त्यामुळे दोनवेळा लग्न लावली जातात. अतिशय भक्तीपुर्ण व उत्साही वातावरणात श्रीं चा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर फटाके फाेडण्यात आले. यानंतर देवस्थानकडून विविध मानकर्यांना मानाची रक्कम देण्यात आली.
दरम्यान येत्या रविवारी (ता. 8) श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव असल्याची माहिती देवस्थानने दिली. 
सातारा सातारा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Khandobas Wedding Ceremony Was Exciting