सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम 

Shrikanchanna Yannam BJP's mayor of Solapur
Shrikanchanna Yannam BJP's mayor of Solapur

सोलापूर  : आरक्षण जाहीर झाल्यापासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची बहुमताने निवड झाली. त्यांनी एमआयएमच्या शहाजीदा बानो शेख यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सारीका पिसे व कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यानी अनपेक्षित माघार घेतल्याने निवडणुकीस वेगळी कलाटणी मिळाली. यन्नम यांना 51 मते, तर शेख यांना 08 मते मिळाली. कॉंग्रेस व शिवसेना, वंचीतचे नगरसेवक तटस्थ राहिले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापालिकेतील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह एमआयएम एकत्रित आले होते.  कालावधीत बऱ्याच घडामोडी झाल्या आणि महाविकास आघाडीला ग्रहण लागले. निवडीची पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडीत फाटाफूट झाली. एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता परंतु आज त्यांनी घुमजाव करत महापौरपदाच्या निवडकीतील उमेदवारी अर्ज कायम ठेवला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. शिवसेनेच्या सारीका पिसे, कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे यन्नम आणि शेख यांच्यात थेट लढत झाली. यन्नम यांच्या बाजूने 51 इतक्‍या नगरसेवकांनी, तर शेख यांच्या बाजूने 08 इतक्‍या नगरसेवकांनी कौल दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com