
सांगली : ‘जागतिक बॅँकेच्या सहकार्याने राज्याला पूर नियंत्रणासाठी ३ हजार २०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यातून सांगली महापालिकेला सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटींचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. या कामांचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.