शिवभक्तांसाठी ‘शटल सर्व्हिस’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

कोल्हापूर - महाड ते रायगडमार्गे होणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे शिवभक्तांना शिवराज्याभिषेकास ६ जूनला हजेरी लावण्यातील अडचण दूर झाली आहे. पाचाड ते रायगड, अशी शटल सर्व्हिस अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे उपलब्ध केली आहे. पाचाड परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. तेथून मिनी बसने शिवभक्‍तांना रायगडच्या पायथ्यापर्यंत सोडले जाणार आहे.

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणाऱ्या शिवभक्तांच्या गर्दीचा आकडा पाहता समितीने कंबर कसली आहे. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या नेतृत्वाखाली ४२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीची जबाबदारी निश्‍चित केली आहे.

देशभरातील शिवभक्तांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्यातील एक अडचण म्हणजे ट्रॅफिक जॅमची. दरवर्षी शिवभक्तांची रायगडावर उच्चांकी गर्दी होत आहे. दुचाकी, चारचाकी, लक्‍झरी, एस.टी.ने शिवभक्त गड पायथ्याला येत आहेत. त्यामुळे महाड ते रायगड मार्गावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत आहे. काही शिवभक्तांना पाचाडमध्ये येऊनसुद्धा ६ जूनच्या सोहळ्याला हजेरी लावता येत नाही. त्यांना सोहळ्याला हजेरी लावता यावी, यासाठी समितीने शटल सर्व्हिसची सेवा उपलब्ध केली आहे. 

रायगडवाडी, निजामपूर, पाचाड परिसरात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा आहे. पाचाड ते रायगडचा पायथा हे अंतर दोन किलोमीटर इतके आहे. समितीने पाचाडमधून शिवभक्‍त्तांना शटल सर्व्हिसद्वारे पायथ्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली आहे. रोप-वेद्वारे दिवसभरात केवळ बाराशे ते तेराशे शिवभक्‍त्त गडावर जाऊ शकतात. त्यामुळे शिवभक्‍त्तांनी गड पायथ्याखालून चालत गडावर जावे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रोप-वेचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे. 

होळीच्या माळावर असेल नियंत्रण कक्ष...
गडावरील होळीच्या माळावर समितीतर्फे नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. वैद्यकीय सेवाही उपलब्ध केली असून, डॉक्‍टरर्स गडावर मुक्कामाला असतील. शिवभक्‍त्त, महिला, युवती यांना काही अडचण असल्यास त्यांनी कक्षाशी संपर्क साधावा.

Web Title: shuttle service for shivbhakt