सोलापुरातील गड्डा यात्रा रामभरोसेच! (व्हिडिओ)

अशोक मुरुमकर/ सुस्मिता वडतीले
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सोलापुरातील ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्‍वर महाराजांची 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला सुरवात होऊन दोन दिवस झाले आहेत. यात्रेत चिमुकले, तरुण, महिला व पुरुषांना आनंद घेता यावा म्हणून होम मैदानावर पाळणे, चिमुकल्यांच्या खेळाची साहित्य मिळणारे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यात आगीच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेऊन योग्य ती काळजी घेण्याची सूचना केल्या होत्या.

सोलापूर : सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त होम मैदानावर उभारण्यात आलेलेल्या स्टॉलमध्ये विद्युत वाहिनीचे उघडे जोड, गॅस टाक्‍यांना चिकटपट्टीचा आधार आणि अग्निरोधकचा अभाव असे धक्कादायक वास्तव "सकाळ'च्या पाहणीत आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दुकानांची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेत दुर्घटना होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सूचना दिल्या होत्या, त्याला केराची टोपली दाखवल्याचे यातून उघड झाले आहे. 

 

हेही वाचा- यंदाही पाऊस सामान्यच; सोलापुरातील सिद्धेश्‍वर यात्रेतील भाकणूक (व्हिडिओ)
जिल्ह्याधिकाऱ्यांकडून सूचना

सोलापुरातील ग्रामदैवत असलेले श्री सिद्धेश्‍वर महाराजांची 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला सुरवात होऊन दोन दिवस झाले आहेत. यात्रेत चिमुकले, तरुण, महिला व पुरुषांना आनंद घेता यावा म्हणून होम मैदानावर पाळणे, चिमुकल्यांच्या खेळाची साहित्य मिळणारे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यात आगीच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेऊन योग्य ती काळजी घेण्याची सूचना केल्या होत्या. यात्रा सुरक्षित व व्यवस्थित व्हावी म्हणून अग्निशामक विभागातील कर्मचारी देखरेख करत आहेत. परंतु अग्निशामक विभागाने कितीही सूचना दिल्या तरी त्यांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. यात्रेतील परिसरात दुकानदारांनी काय दक्षता घेतली पाहिजे याची माहिती बुधवारी अग्निशामक अधीक्षक यांनी दुकानदारांना सांगितले. यात्रेतील परिसराची पाहणी करताना अनेक दुकानांत अनेक दुकानांत गॅस सिलिंडरचे वायर लिकेज झाले असल्यामुळे त्या वायरला चिकटपट्टीचा आधार बसवला आहे. तर अनेक दुकानातील वायरिंग उघड्यावर लावण्यात आले आहे. यात्रेतील दुकाने सुरक्षित असलेली दिसून येत नाहीत. पण त्यामुळे सिद्धेश्‍वरांच्या यात्रेत कधीही आगीची भीषण घटना घडण्याची शक्‍यता आहे. यावर नियंत्रण राहावे म्हणून अग्निशामक दलाचे कर्मचारी सतत पाहणी करण्यासाठी सतर्क राहिले आहेत. सोलापूरची यात्रा ही सर्वांत मोठी यात्रा म्हणून नावारूपाला आहे. या यात्रेत सर्व सोयीसुविधा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा- सिद्धेश्‍वर यात्रेत आज काय झाले विधी (व्हिडिओ)
अग्निशामक विभागाची सर्तकता

अग्निशामक विभागानेच यात्रेत अशा काही घटना घडू नये यासाठी दुकानदारांना दुजोरा दिला असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वजण सतर्क राहणे गरजेचे आहे. यात्रेतील दुकानदारांना अग्निशामक विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात सूचना दिल्या तरीही त्या सूचना पाळल्या जातील की नाही याबाबतीत काही सांगू शकत नाही. 

पाहणी करुन नावे घेतली
दुकानांची पाहणी करण्यात येत आहे. अनेक दुकानदारांनी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे आमचा विभाग सतर्क आहे. दुकानदारांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची पाहणी करून नावे घेतली आहेत. त्यांनी व्यवस्था नाही केली तर कारवाई केली जाईल. 
- केदार अवटे, अग्निशामक अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddheshwar Yatra in Lack of fire extinguisher