सर्वांनीच कर्तव्य पाळावे

सर्वांनीच कर्तव्य पाळावे

मी महाद्वार रोड - ताराबाई रोड परिसरात राहतो...
वाहतूक कोंडीची कारणे
 बिल्डरांनी इमारत बांधली; पण पार्किंगसाठी जागाच नाही ठेवल्या...
 आमच्या भागात तर एक एक इमारतीना पार्किंग आहे; पण पाणी साचून तळं होतं. त्या गाड्या सगळ्या रस्त्यावर येतात.
 एक एक इमारतींना तर पार्किंगऐवजी बिल्डर लोकांनी दुकानगाळे काढलेत. त्या दुकानदारांच्या-फ्लॅटधारकांच्या गाड्या रस्त्यावर.. 
 एका इमारतीमध्ये ३० ते ४०  दुकानगाळेधारक आहेत.
 याला फेरीवालेही कारणीभूत आहेत. आखून दिलेल्या जागेच्या बाहेर बिनधास्तपणे व्यापार करतात. फळवाले रस्त्यावर बिनधास्तपणे व्यापार करत असतात. महानगरपालिकेची गाडी आली की, तेवढ्यापुरतं हलवाहलवी करतात.
 सर्व वाहनधारकांना पार्किंगची नसलेली शिस्त.. कधी पण कुठे पण कसं पण लावून आलोच दोन मिनिटांत म्हणायचं ते यायचं एक-दोन तासांनी.  
 ही सर्व कारणे ट्रॅफिक जामसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
- केदार वाघापूरकर

बारमाही गजबलेल्या िठकाणी वाहनांची वर्दळ असणे कोल्हापुरात साहजिकच आहे. तरी कोणत्याही स्थानिक किंवा बाहेरील वाहनधारकांना किंवा वाहतूक शाखेच्या प्रशासनाला किंवा महानगरपालिका प्रशासनाला दोष देऊन समस्या सुटणार नाही; परंतु नियोजनाचा अभाव यामुळे कळत-नकळत वरील सर्वांचा वैयक्तिक दोष आहे. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला घाईगडबड आहे. कोणाकडे थांबण्यासाठी वेळ नाही. म्हणूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊन ही समस्या आजकाल घट्ट होत आहे. जर प्रत्येकाने विशेषत: वैयक्तिक वाहतूक नियमांचे जरा जरी पालन करण्याचा प्रयत्न केल्यास ‘ट्रॅफिक जाम’ ही समस्या कमी होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
- नागनाथ गु.गावसाने, उचगाव (पूर्व).

तक्रार - कोल्हापुरातील सर्वांत जास्त वाहतूक कोंडी जर कोठे होत असेल तर ते ठिकाण आहे रंकाळा. सकाळ असो की, दुपार येथे वाहतूक कोंडी ठरलेलीच आहे आणि लवकरच त्या रस्त्यावरून जाणारे लोक श्वसनाच्या त्रासाने त्रस्त होणार आहेत, ह्यात कोणतीच शंका नाही. 
ह्यावर उपाययोजना 
शालिनी पॅॅलेस ते जाऊळाचा गणपती पूर्णपणे नो पािर्कंग झोन बनवावा. 
रंकाळा टॉवर येथील िकत्येक वर्षे बंद असणारा िसग्नल त्वरीत सुरू करावा. 
आणि सर्वांत सोईस्कर जर उपाय योजायचा असल्यास डी मार्ट ते रंकाळा स्टॅंड उड्डाण पूल उभारावा.
- आदित्य पलसुले.

चला, वाहतूक कोंडी कमी करू - 
व्हॉटस्‌ ॲप क्रमांक - ९१४६१९०१९१
आपली प्रतिक्रिया पाठवताना आपले नाव आणि पत्ता आवर्जून द्यावा. कारणांबरोबर उपायही सुचवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com