कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना रक्ताने केलेल्या सह्यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

कोल्हापूर -  कोतवालांना चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून सेवेत घ्यावे, यासाठी गेले २२ दिवस विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन केले जात आहे.

दरम्यान, आज याच मागणी निवेदनावर रक्ताने सह्या करून निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना हे निवेदन देण्यात आले. तसेच, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याच आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. तसेच, कोतवालांच्या मागण्या तत्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. शुक्रवारी (ता. २८) मुंडण आंदोलन केले जाईल. 

कोतवाल संघटनेने मागणी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करून घ्यावे, यासाठी वारंवार मागणी केली जात आहे. उपोषण, बेमुदत बंद, ठिय्या आंदोलन, मुंडण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. तरीही शासनाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज कोतवालांनी आपल्या मागण्यांच्या निवेदनावर रक्तांनी सह्या करून हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. या वेळी संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, दीपक शिंदे, संतोष पाटील, पांडुरंग बरकाळे, बाजीराव कांबळे, नामदेव चौगले, पांडुरंग डवरी, महादेव भोसले, उमेश कांबळे यांनी रक्ताने सह्या केल्या.

Web Title: signature done by blood on Memorandum of appeal