भिलवडीत खुनाच्या निषेधार्थ मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कडकडीत बंद : नराधमांना फाशी देण्याची मागणी
भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज पंचक्रोशीत कडकडीत "बंद' पाळला. आज सकाळी निषेध म्हणून भिलवडी येथे मूक मोर्चा काढून नराधमांना फाशी देण्याची मागणी केली.

कडकडीत बंद : नराधमांना फाशी देण्याची मागणी
भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून आज पंचक्रोशीत कडकडीत "बंद' पाळला. आज सकाळी निषेध म्हणून भिलवडी येथे मूक मोर्चा काढून नराधमांना फाशी देण्याची मागणी केली.

शाळकरी मुलीचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मुलीचा मृतदेह प्रथम सांगली सिव्हिलमध्ये आणला. तेथून मिरज वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवला. शवविच्छेदनानंतर रात्री 8 च्या सुमारास भिलवडीकडे मृतदेह नेण्यात आला. रात्री उशिरा कृष्णाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मुलीच्या खुनानंतर काल जिल्ह्यासह सर्वत्र संतप्त पडसाद उमटले होते. भिलवडीसह पंचक्रोशीने सायंकाळी "बंद'चे आवाहन केले होते. त्यानुसार आज सकाळी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, औदुंबर, ब्रह्मनाळ, धनगाव येथे सकाळपासून कडकडीत बंद पाळल्याचे चित्र दिसले. दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी भिलवडी बस स्थानकापासून निषेध मूक मोर्चा निघाला. गावातील विविध मार्गांवरून मूक मोर्चा भिलवडी पोलिस ठाण्यासमोर आला.

तेव्हा पाच विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले.

चौघे संशयित ताब्यात
माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी भिलवडी पोलिसांनी मुलीच्या घराजवळील चार संशयितांना ताब्यात घेतले; तसेच इतर संशयितांचीदेखील कसून चौकशी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असे सांगितले.

Web Title: silent march to protest the murder in bhilwadi