अंबाबाई मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर गळती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात काल (ता. २४) झालेल्या पावसामुळे मोठी गळती लागली. मंदिरात पाणी साठण्याबरोबरच प्रदक्षिणा मार्गावर गळती सुरू झाली. मंदिरात पावसामुळे गळती होण्याचे प्रमाण २००५ पासून सुरू आहे. मंदिराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपयांचे नियोजन करण्यात येत असताना मंदिराच्या या मूलभूत प्रश्‍नाकडे १२ वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम आतापर्यंत झाले.

शहर व परिसरात काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. अंबाबाई मंदिरातून जाणाऱ्या गटारांची स्वच्छता नसल्याने मंदिरात मोठे तळेच तयार झाल्याचे चित्र होते. पावसामुळे मंदिराच्या आवारात ज्या पद्धतीने दाणादाण उडाली, तशीच अवस्था मंदिराच्या आतील प्रदक्षिणा मार्गाची झाली होती. मोठ्या पावसामुळे येथे गळती सुरू झाल्याचे दिसले. दोन ते ठिकाणांहून पाणी झिरपत होते. प्रदक्षिणा मार्गावर पहिल्यांदाच अशा पद्धतीची गळती सुरू झाली. 

या आधी २००५ मध्ये मंदिरात श्री यंत्राच्या समोर, तसेच २०११ मध्येही मंदिरात गळती दिसून आली होती. त्या वेळी ही गळती मुख्य गाभाऱ्यापासून बाहेर पितळी उंबऱ्याच्या बाहेर होती; परंतु आता ही गळती प्रदक्षिणा मार्गावर सुरू झाली. दगडांमधून पाणी थेट पाझरून आत येऊ लागल्याने नेमकी गळती कशामुळे सुरू झाली, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. १२ वर्षांपासून मंदिरात गळतीचे हे प्रकार सुरू आहेत. परंतु, त्यावर ठोस उपाययोजना आतापर्यंत केली नाही. 

नूतन अध्यक्षांकडून अपेक्षा
सध्या मंदिराचा तीर्थक्षेत्र आराखडा, मंदिरावर कायमस्वरूपी रोषणाई अशा सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे; परंतु मंदिरातील या गळतीकडे जी मुख्य गरज आहे, तिच्याकडे दुर्लक्ष झाले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला तब्बल दहा ते बारा वर्षांनी नूतन अध्यक्ष मिळाले. त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज वाटते.

Web Title: sindhudurg news ambabai temple