अरेरे ! महाबळेश्‍वरला सहा जनावरांचा मृत्यू

अरेरे ! महाबळेश्‍वरला सहा जनावरांचा मृत्यू
Updated on: 

महाबळेश्वर : पालिकेच्या कचरा डेपोनजीक असलेल्या जंगलामध्ये तीन जनावरे, तर कारवीअळी गावामध्ये तीन जनावरे अशा सहा जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घटना घडली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले असून, विषाचा कोणता प्रकार आहे हे समजण्यासाठी नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली.
 
शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कारवी अळी गाव असून, त्याच्या बाजूलाच पालिकेचा कचरा डेपो आहे. कारवी अळी गावातील जनावरेही या कचरा डेपोमध्ये जंगल परिसरातून चारण्यासाठी येतात. याबाबत पालिकेने 2017 मध्ये कारवी अळी येथील गावकऱ्यांना व दूध व्यावसायिकांना घनकचरा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा उपद्रव होत असल्याचे कळविले होते. ही जनावरे कचरा डेपोवरील कचरा व प्लॅस्टिक पदार्थ खात असून, त्यामुळे जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यापासून मिळणाऱ्या दुधापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून, ही जनावरे मोकळी सोडू नयेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र, तरीही या कचरा डेपो परिसरात ही जनावरे चरण्यासाठी सोडण्यात येतात. आजदेखील या परिसरात शेकडो जनावरे, कुत्रे असून, सोमवारी सकाळी कारवी अळीमधील गावकऱ्यांना कचरा डेपो परिसरातील जंगलामध्ये तीन, तर कारवी अळी गावामध्ये तीन अशी एकूण सहा जनावरे मृत आढळून आली. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा : शाळांपुढे कोरोना संबंधी हा यक्ष प्रश्न ?

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया, डॉ. संदीप आरडे यांनी जनावरांची पाहणी करून शवविच्छेदन केले. प्राथमिक माहितीनुसार विषबाधेने मृत्यू झाला असल्याची शक्‍यता डॉ. सिसोदिया यांनी व्यक्त केली. विषाचा कोणता प्रकार आहे हे समजण्यासाठी नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती दिली. कारवी अळी येथील गावकऱ्यांनी सकाळपासूनच कचरा डेपो परिसरात गर्दी केली होती. नगरसेवक कुमार शिंदे, युसूफ शेख यांच्यासह शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर, सचिन वागदरे, यशवंत घाडगे, आकाश साळुंखे, मिथिलेश कानडे, महेश गुजर, शुभम कुंभारदरे, राहुल शेलार, सह्याद्री प्रोटेक्‍टर्सचे प्राणीमित्र संदेश भिसे, सुनीलबाबा भाटिया आदींसह याठिकाणी गावकऱ्यांची भेट घेतली. डी. एम. बावळेकर यांनी संबंधित प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, दुभत्या जनावरांच्या मृत्यूप्रकरणी गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

वाचा : मैत्रिणीचा नंबर देणे तिच्या आले अंगलट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com