कऱ्हाडमध्ये सहा संशयीतांच्या हद्दपारीची कारवाई

सचिन शिंदे 
गुरुवार, 29 मार्च 2018

भांडण्यात सहभागी असलेल्या त्या संशयीतांची जुन्या गुन्ह्यांची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विरोधात चार ते पाच दिवसात ती कारवाई करण्यात येणार आहे.

कऱ्हाड - मारामारीत सहभागी झालेल्या सराईत सहा संशयीतांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. त्यांच्यावर एममीआयडी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना किमान एक वर्षभर त्यांना सातारा व सांगली जिल्ह्यातील हद्दपार करण्याचे प्रस्ताव देण्यात येणार आहेत. किरकोळ कारणावरून कुटूंबास मारहाण झाली होती. गुन्ह्यात सहा जण सराईत आहेत. त्यांचे पोलिस रेकॉर्ड आहे. त्यांच्यावर पाच पेक्षा जास्त गुन्हे आहे. परवाच्या मारामारीतून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रय़त्न केला आङे, अशा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे त्यांच्या समाजात दहशत माजवण्याच्या अॅक्टीव्हीटी विरोधात पोलिसांनी त्वरीत हलचाली करून हद्दपारीचे प्रस्ताव केले आहेत. 

भांडण्यात सहभागी असलेल्या त्या संशयीतांची जुन्या गुन्ह्यांची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विरोधात चार ते पाच दिवसात ती कारवाई करण्यात येणार आहे. किरकोळ कारणावरून येथे तीन दिवसापूर्वी कुटूंबास वीस ते पंचवीस लोकांनी गज, काठ्यांनी मारहाण केली. त्यात सुमारे पंधरा जणा विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यात सल्याचेप्याच्या गॅगसह विविद गुन्ह्यात संशयीतांचा त्यात समावेश होता. टोळीसदृश्य स्थिती निर्माण करून त्या संशयीतांनी दहशतीचे वातावरम मलकापूर व कऱ्हाड परिसरात निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना त्याच काल रात्री तत्काळ पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात चालवत नेले होते. त्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सहा ते सात सराईत संशयीतांचा समावेश असल्याने पोलिसांनी त्या गुन्ह्याची व्याप्ती वाढू न देता त्यावर कडक कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या विरोधात गुंडा रजिस्टरमध्ये पोलिसांचे रेकॉर्ड असून त्या पाच ते सहा संशयीतांवर खून, खूनाचा प्रय़त्न, खंडणी मागणे, अपहरण करणे, एखाद्या विरोधात कट रचणे असा स्वरूपाचे गुन्हा पोलिसात दाखल आहेत.

कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्य़ा चेप्या याच्या टोळीतील संशयीतांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यासाठी २००९ पासूनचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्याची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार कारवाई होणार असून त्यांच्या विरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. 

Web Title: Six criminals deportation in karhad