खंडोबाचा षड्‍रात्रोत्सव सुरू 

सनी सोनावळे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

राज्यातील खंडोबाचे स्थान असलेल्या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. आजपासून खंडोबाचा षड्‍रात्रोत्सव सुरू झाला आहे.

टाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव रोठे (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर आजपासून 
षड्‍रात्रोत्सवास देवाची घटस्थापना करून प्रारंभ झाला.

त्यानिमित्त देवस्थान परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थान गडावर 2 डिसेंबरला असलेल्या चंपाषष्ठीला देव दीपावली संबोधले जाते. त्यानिमित्त उत्साहाची सांगता होणार आहे. 

राज्यातील खंडोबाचे स्थान असलेल्या मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. आजपासून खंडोबाचा षड्‍रात्रोत्सव सुरू झाला आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणे सणांचा व पवित्र दिवसांचा मानला जातो. या वेळी देवस्थान गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहाला 36 वर्षे झाली असून, पहिल्या दिवशी मनोहर महाराज सिनारे यांची कीर्तन सेवा भाविकांना पर्वणी ठरली. ते म्हणाले, की दिव्यत्व ज्याचे ठिकाण आहे, त्यालाच देव म्हणतात. देव होण्यासाठी आधी सन्मार्गाने वर्तन करून संतपद प्राप्त करावे लागते. संसारात राहूनसुद्धा परमार्थ करता येतो. माऊली या शब्दांमधून मा-मानवता, उ-उदारता, ली-लीनता असा अर्थ त्यांनी सांगितला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The six dayes festival of Khandoba begins