मिरज शहरात आणखी सहाजणांना "कोरोना'...ग्रामीणमध्ये पाच रूग्ण...अफवांवर विश्‍वास नको 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

मिरज (सांगली)- मिरज शहरात गुरूवारी 24 कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली असतानाच आज दुपारपर्यंत आणखी सहा रूग्ण बाधित आढळले. तसेच मिरज ग्रामीण भागातही पाच रूग्ण आढळले आहेत. 

मिरज (सांगली)- मिरज शहरात गुरूवारी 24 कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली असतानाच आज दुपारपर्यंत आणखी सहा रूग्ण बाधित आढळले. तसेच मिरज ग्रामीण भागातही पाच रूग्ण आढळले आहेत. 

मिरजेतील हॉटेल व्यवसायिकाचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच दिवसभरात 24 रूग्ण आढळले होते. त्यानंतर आज मिरज शहरात दुपारपर्यंत सहा रूग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये नदीवेस परिसरातील तीन, कमानवेस आणि गोठण गल्लीतील रूग्णांचा समावेश आहे. तसेच मिरज तालुक्‍यात गुंडेवाडी, अंकली, बिसूर येथे प्रत्येकी एक रूग्ण तर कवलापूर येथे आणखी दोन रूग्ण बाधित आढळून आले. 
दुपारपर्यंत मिरज तालुक्‍यात पाच आणि शहरात सहा रूग्ण आढळले असताना काहीजणांनी जादा रूग्ण सापडले अशी अफवा पसरवली होती. तसेच सोशल मिडियावर देखील मिरज शहरात 31 रूग्ण सापडले अशी अफवा "व्हायरल' झाली होती. त्यामुळे अनेकजण खात्रीसाठी विचारणा करत होते. मिरजेचे तहसिलदार रणजीत देसाई यांनी "कोरोना' बाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six more corona in Miraj city . five patients in rural areas . don't believe the rumors