साताऱ्याजवळ अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कर्नाटकातील धारवाड येथील हे कुटुंब असून, निजामुद्दीन सौदागर असे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. अन्य मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. बोरगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळील काशीळ गावाजवळ आज (बुधवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा गाडीवरुन ताबा सुटुन गाडी झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले, तर चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, अंदाजे साडे तीन वर्षांचा एक मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे.

कर्नाटकातील धारवाड येथील हे कुटुंब असून, निजामुद्दीन सौदागर असे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. अन्य मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. बोरगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास कर्नाटकहून मुंबईकडे चाललेल्या महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक KA 25 MC 4359 ही काशीळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर आदळली. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six people dead in accident near Satara on Pune Banglore highway