

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून सहा विद्यार्थ्यांकडून तब्बल २२ लाख रुपये उकळले.
esakal
Student Fraud Money : एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश देतो, असे सांगून सहा विद्यार्थ्यांची २२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेतील बोगस लिपिक भरती प्रकरणातील संशयित दिनेश पुजारी याने ही फसवणूक केल्याची तक्रार सात महिन्यांपूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल आहे, मात्र त्याची चौकशी झालेली नव्हती. महापालिकेतील फसवणूक प्रकारानंतर पोलिसांना जाग आली असून, त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.