महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र - मुख्यमंत्री

महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र - मुख्यमंत्री

लोणंद/खंडाळा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले नसते तर महाराष्ट्र पुरोगामी झाला नसता, राज्यात समतेचे राज्य आले नसते, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली.  

नायगाव (ता. खंडाळा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शंभूराज देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे आयटीआयला परवानगी देण्याबाबत तांत्रिक अडचणी आहेत. मात्र, मुलींच्या उद्योग विकास प्रशिक्षणाची काय सोय करता येईल ते पाहू. तसेच 

शिरवळ-नायगाव-मांढरदेव या रस्त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करू. तालुक्‍यातील नीरा-देवघर प्रकल्पाच्या गावडेवाडी, शेखमिरवाडी व वाघोशी येथील उपसा जलसिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही कामे सुरू नाहीत. ही कामे त्वरित सुरू करून खंडाळा तालुक्‍यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न करू. या योजनांसाठी केवळ १९ टक्के इतकेच वीजबिल भरावे लागेल. उर्वरित ८१ टक्के वीज बिलाचा बोजा शासन सोसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. छगन भुजबळ म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे अठरापकड जातींना बरोबर घेऊन राज्य कारभार केला, त्याच धर्तीवर जाती- जातीमध्ये भेद होऊ न देण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. 

नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यामुळे स्मारकाकडे जाणारे सर्वच रस्ते या सावित्रीच्या लेकींनी फुलून गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com