
बेळगाव : भाजलेल्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम केएलई रुग्णालयातील ‘स्किन बँक’ करत आहे. कोरोना काळात सुमारे दीड वर्ष ही बँक बंद होती. यामुळे अनेक रुग्णांना अडचणी आल्या. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे दीड महिन्यापासून ‘स्किन बँके’ला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.विविध आगीच्या घटनांमध्ये भाजल्यानंतर तत्काळ उपचार गरजेचे असतात. अशावेळा अनेकांची त्वचा (स्किन) जळते. त्यावेळी या ‘स्किन बँके’तील शिल्लक त्वचेचा (स्किन) वापर केला जातो. अनेक रुग्णांना ही बँक वरदान ठरत आहे.
या बँकेचा बेळगाव शहरासह देशातील विविध शहरातील रुग्णालयातून मागणी आहे. नुकताच दिल्लीतील रुग्णालयातील रुग्णांनाही येथून त्वचा (स्किन) देण्यात आली. तसेच मुंबईतूनही मागणी आहे. ‘स्किन बँके’कडे सध्या सुमारे २० हजार चौरस सेंटीमीटर इतकी स्किन शिल्लक आहे. ज्याचा अनेकांना लाभ होणार आहे. कोरोना काळात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या अधिक होती. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही अधिक होती. यामुळे ही बँक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता बँक सुरु झाली असून स्कीन डोनेशनही केले जात आहे. केएलईकडे रामन्नवर ट्र्स्टच्या माध्यमातूनही स्किन डोनेशन होत आहे.
"कोरोनाकाळात त्वचा (स्किन) घेऊन त्याची साठवणूक करणे धोकादायक होते. यामुळे सुमारे दीड वर्ष ‘स्किन बँक’ बंदच होती. आता ही ‘स्किन बँक’ पुन्हा सुरू झाली आहे. दिल्लीतील एका रुग्णाला येथून नुकतीच ‘स्किन’ दिली आहे."
- डॉ. राजेश पवार, प्रमुख, स्किन बँक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.