बुद्धजय आणि मोनालीचा "पे बॅक टू सोसायटी'चा नारा 

परशुराम कोकणे 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सोलापूर : लग्न समारंभ म्हटलं की आहेर, मान-पान, सत्कार, हार, तुरे, फेटे असा मोठा डामडोल आला. केवळ हौस म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. या सर्व गोष्टींना फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने भारतीय संविधानाला प्रमाण मानून विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळूर येथे कार्यरत असणाऱ्या मोनाली मेश्राम यांनी आपला मंगल परिणय सोहळा पार पाडला. दोघांनी "पे बॅक टू सोसायटी'चा नारा दिला आहे. 

सामाजिक दायित्व म्हणून नवदांपत्यांनी आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विद्यार्थ्याना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. "पे बॅक टू सोसायटी' ही संकल्पना राबवीत त्यांनी मदतीच्या धनादेशाचे वाटप शनिवारी स्वागत समारंभात करण्याचे ठरविले. 

विवाह नोंदणी कार्यालयात मंगळवारी दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह झाला. या वेळी जैन गुरुकुल प्रशालेचे प्राचार्य आशुतोष शहा, ऍड. विक्रम वाघमारे, बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, बाळासाहेब डोळसे, विजयकुमार लोंढे, पत्रकार किरण बनसोडे यांनी नवदांपत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून आम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अभ्यासाकरिता पुस्तके मिळवून देण्यासाठी गरजूंना परीक्षा फी सुद्धा आम्ही देणार आहोत. 
- बुद्धजय आणि मोनाली, नवविवाहित दांपत्य

Web Title: Slogan of Buddha and Monali's "Pe Back to Society"