मॉल, सुपर मार्केटमुळे छोटे व्यापारी तणावाखाली! 

small business mens in tension due to malls supermarket
small business mens in tension due to malls supermarket

सोलापूर : जुळे सोलापुरातील मॉल आणि सुपर बाजारामुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार अडचणीत आले आहेत. नवीन ग्राहक येत नाहीत. जुन्या ग्राहकांवरच व्यापार, व्यवसाय चालू आहे. जोवर येथे उद्योगधंदे, व्यवसाय येणार नाहीत तोवर येथील छोट्या व्यापाऱ्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, जुळे सोलापूर परिसरात 80 टक्के निवृत्त लोक राहतात. त्यांची मुले पुणे, मुंबईला राहतात. आई-वडिलांना भेटायला आल्यावर श्रीखंड किंवा मिठाई वगैरे घेऊन जातात एवढंच. एक-दोन दिवस राहून पुन्हा ही मंडळी निघून जातात. अनेक ज्येष्ठ नागरिक आलेली पेन्शन आणि घर भाड्याची रक्कम मुलांना पाठवून देतात. अशाप्रकारे सोलापूरचा पैसा बाहेर जात आहे. 

व्यवसाय वाढविण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे, पण ग्राहकच नाही अशी स्थिती आहे. व्यवसायासाठी बॅंक कर्ज द्यायला तयार आहेत, पण काही कारणामुळे कर्जाच्या रकमेची परतफेड करता आली नाही तर..? या विचाराने अनेकजण धाडस करत नसल्याचे चित्र आहे. 

आपल्या अडचणी सांगताना चैतन्यनगर भाजी मार्केट परिसरातील व्यापारी उमेश शिंदे म्हणाले, "जुळे सोलापुरात अनेक अपार्टमेंट, सोसायट्यांमध्ये नोकरीच्या निमित्ताने परगावाहून आलेले लोक आहेत. मोठा पगार असणाऱ्या या मंडळींचा महिन्याचा किराणा, इतर खरेदी थेट मॉल, सुपर मार्केटमध्ये होत आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने तेथे त्यांचा ओढा वाढला आहे. हा ग्राहक कधीतरीच भाजीपाला किंवा दूध पाकीट घेण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांकडे येतो.'' 
निवासी शिक्षण संस्था, मोठ्या कंपन्या येथे आल्या पाहिजेत किंवा मुलांच्या शिक्षणाकरिता राहण्यासाठी लोक आले पाहिजेत तरच येथील छोटे व्यापारी जगतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

आम्ही 1994 पासून या भागात राहण्यासाठी आहोत. मॉल, सुपर मार्केटमुळे दिवसेंदिवस छोट्या व्यापाऱ्यांची परिस्थिती अवघड होत आहे. दिवस ढकलण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. यावर समस्येवर सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा. 
- उमेश शिंदे, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com