स्मार्ट सीटीला मिळणार शेल्टरचा विसावा!

stainless-steel-bus-stop-sh.jpg
stainless-steel-bus-stop-sh.jpg

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम सुरू असलेल्या रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर सहा बस शेल्टर उभारले जाणार आहेत. त्यापैकी हरिभाई देवकरण प्रशाला आणि महापालिकेसमोर दोन बस शेल्टर बसवण्यात आले आहेत. आता, महापालिकेसमोरील सोलर पाथवे मधून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर स्मार्ट रोडवरील स्ट्रीट लाइटसाठी केला जाणार आहे. 

सोलापुरात स्मार्ट रोडच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून आता दुसऱ्या बाजूचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर आणखी चार बस शेल्टर उभारले जाणार आहेत. परिवहन विभागाशी बोलून उर्वरित चार ठिकाणे निश्‍चित केली जाणार आहेत.

दरम्यान, हा रस्ता चकाचक आणि प्रकाशमय करण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत उभारलेल्या सोलर पॅनलच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या 30 किलोवॅट विजेचा वापर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाइटसाठी केला जाणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अधिकाधिक वापर करून महापालिकेवरील आर्थिक बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे अभियंता तपन डंके यांनी दिली. 

स्मार्ट सिटीअंतर्गत नियोजित प्लॅन 
स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिवहनच्या उपक्रमातील पाच ते सात बसगाड्यांद्वारे सोलापूरसह परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांसाठी स्मार्ट सिटी दर्शन घडविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून परिवहनाच्या उत्पन्नात भर पडेल आणि पर्यटकांनाही सोलापूरचे दर्शन होईल. त्यातून सोलापूरच्या पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश असून त्यातून अनेकांना रोजगार मिळेल व आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल. 

  ठळक बाबी... 
- बस शेल्टरवरील डिजिटल फलकांद्वारे प्रवाशांना समजणार बसचे लोकेशन 
- विविध कंपन्या अन्‌ उद्योगांच्या डिजिटल जाहिरातींमधून मिळेल महापालिकेला        उत्पन्न. 
- पुणे, मुंबईच्या धर्तीवर प्रवाशांना बस शेल्टरमध्ये मिळणार आडोसा 
- प्रवाशांना बसण्यासाठी नव्हे तर उभारण्याची असेल बस शेल्टरमध्ये सोय 
- परिवहन बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्यास त्याच ठिकाणी होणार बसण्याची               व्यवस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com