

स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्न थांबवण्याच्या निर्णयामागील खरी गोष्ट समोर आली आहे.
esakal
Smriti Mandhana wedding News : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्न सोहळ्याचे कार्यक्रम सुरू असताना अचानक तिच्या वडिलांची तब्येत बिघडली. स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकारासारखी लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेमुळे कुटुंबियांनी अत्यंत प्रतिक्षेत असलेला विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छललाही भावनिक तणावामुळे सांगली येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. नंतर पालाश मुंबईत परतला असून तो विश्रांती घेत आहे आणि प्रकृती सुधारते आहे, अशी माहिती आई अमिता मुच्छल यांनी दिली. स्मृतीच्या वडिलांवरील भावनिक जिव्हाळ्यामुळे त्यांचा मुलगा मानसिकदृष्ट्या खूपच हादरला, असेही त्या म्हणाल्या.