Palash Muchhal Admitted to Hospital After Mandhanas Father Falls Ill
Esakal
पश्चिम महाराष्ट्र
स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार
भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधनाचं पलाश मुच्छल याच्याशी आज लग्न होणार होतं. मात्र तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं हा लग्नसोहळा रद्द करण्यात आलाय. दरम्यान, पलाश मुच्छल यालाही रुग्णालयात दाखल केल्याचं समजते.
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा सांगलीत आयोजित केला होता. मात्र स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामुळे स्मृतीने वडिलांची प्रकृती बरी होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता पलाश मुच्छल यालाही रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नसोहळा पुढे ढकलल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याला अॅसिडीटीचा त्रास झाला. त्यामुळे किरकोळ आजारी पडला, ते दाखवण्यासाठी आला. उपचार घेऊन तो निघाला.

