शिराळ्यातील नाग प्रतिमेची दुरवस्था

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 28 जून 2018

लोहार गल्ली येथील पुलावर असणाऱ्या चार नाग प्रतिमा पैकी दोन नागप्रतिमा फुटून त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. शिराळा म्हटले की, सर्वाना आठवते ते नागपंचमीचे शिराळा; कारण येथिल जिवंत नागपूजेसाठी शिराळा जगभर प्रसिद्ध होते.

शिराळा - येथील लोहार गल्ली येथील पुलावर असणाऱ्या चार नाग प्रतिमा पैकी दोन नागप्रतिमा फुटून त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
शिराळा म्हटले की, सर्वाना आठवते ते नागपंचमीचे शिराळा; कारण येथिल जिवंत नागपूजेसाठी शिराळा जगभर प्रसिद्ध होते.

2002 पासून जिवंत पूजेवर बंदी आली असल्याने आत्ता जिवंत नागा ऐवजी नाग प्रतिमेची पूजा केली जाते. येथील तोरणा ओढ्यावर पुलाचे बांधकाम करत असताना हा पूल मुख्य रस्त्यावरील असल्याने त्या त्याच्या दोन्ही बाजूला चार नाग प्रतिमा काढल्या आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अनोळखी प्रवाशांना ते नाग पाहून आपण नागपंचमीच्या शिराळ्यात आल्याचे काळत आहे. पण त्यापैकी दोन नाग प्रतिमांची दुरवस्था झाली असून ती तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी नागप्रेमींच्यातून होत आहे.

Web Title: snake image distraction in shirala

टॅग्स