या सापाची अंडी कृत्रिमरीत्या उबवली...

 The snake's eggs were artificially hatched ...
The snake's eggs were artificially hatched ...

इस्लामपूर ः सर्पमित्र व प्राणिमित्र विकास माने, संग्राम अवघडे व शुभम कांबळे यांनी शेतात मिळालेली तस्कर या जातीच्या बिनविषारी सापाची अंडी योग्य तापमानात कृत्रिमरीत्या उबवून सापांच्या पिलांना जन्म दिला. 

आष्टा येथील एका हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम सुरू असताना शेतकऱ्यांना तस्कर या जातीचा साप आढळला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र संग्राम अवघडे यांना सांगितले. संग्राम अवघडे व सहकारी शुभम कांबळे तिथे गेल्यानंतर दोन साप असल्याचे समजले. त्यातील एक अत्यंत विषारी अशा घोणस जातीचा, तर दुसरा साप बिनविषारी तस्कर जातीचा होता. हळद काढताना हळदीसोबत सापाची पाच अंडीसुद्धा बाहेर पडलेली दिसली.

घोणस अंडी घालत नाही तर थेट पिलांना जन्म देतो. त्यामुळे ही अंडी तस्कर या जातीच्या सापाची असणार हे त्यांनी ताडले. पण अंडी तशीच पडून राहू दिली तर खराब होणार म्हणून त्यांनी अंड्यांना कृत्रिमरीत्या उबवायचे ठरवले. त्यासाठी महाराष्ट्र ऍनिमल रिट्रायविंग असोसिएशनचे अध्यक्ष प्राणिमित्र विकास माने यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे ती अंडी सुपूर्द केली.

सापांची अंडी रबरासारखी मऊ कवचाची व लांबट असतात. त्यांना योग्य तापमानासोबत योग्य आर्द्रता द्यावी लागते. त्यांनी एका मोठ्या बरणीत ओलसर माती व त्यावर थोडा पाला पाचोळा टाकून योग्य तापमान तयार केले. त्यात अंडी ठेवून दिली. अंडी मिळालेल्या दिवसापासून 35 दिवसांत तीन पिलांचा जन्म झाला. 

सर्पमित्रांना संपर्क साधा

पिल्ली 10 ते 12 इंचाची आहेत. लहानपणापासून शिकार करून निसर्गात राहू शकतात. घरात साप अथवा इतर वन्यजीव आढळल्यास त्याला न मारता, त्याच्याजवळ न जाता जवळच्या सर्पमित्रांना संपर्क साधावा. 

- विकास माने, सर्पमित्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com