

मिरजेत सोशल मीडियाच्या माध्यमातून युवांना जाळ्यात ओढून फोटो-व्हिडिओ काढून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
esakal
Miraj Crime News : मिरजेसह सांगली, कोल्हापूर भागातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे लुटणाऱ्या महिलेसह साथीदाराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हनी ट्रॅपच्या या प्रकारामुळे पोलिसांनीही गंभीरपणे तपास करत प्रकरणाची व्याप्ती तपासण्यास सुरुवात केली आहे.