
मात्र एक मजेशीर व्हिडोओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे
सांगली : गेल्या काही महिन्यापासून बर्ल्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का ? असं म्हणताच ही कोंबडी मात्र 'नको नको' म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे.
तुला कापू का? कोंबडी पहा काय म्हणते#Viral #ViralVideo #Sangli pic.twitter.com/XJXbauhqRT
— Siddharth Latkar (@siddharthSakal) February 3, 2021
राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अशा अनेक ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याचा संसर्ग वाढू नये त्यामुळे पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या नष्टही करण्यात आल्या आहेत. या सगळ्यात मात्र हा कोंबडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगली जिल्ह्यात पोल्ट्री फार्म व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथूनच अंडी आणि कोंबड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच खवय्यांची संख्या जास्त असल्याने मासांहारावर ताव मारला जातो. मात्र खवय्यांनी भितीपोटी आस्वाद घ्यायचे कमी केले होते. यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी महापालिकेने चिकण पार्टीचे आयोजनही केले होते. मात्र सोशल मिडीयावरील या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा - गोकुळ सभेत गोंधळ: घोषणाबाजीने वातावरण तापले
एका चिकण दुकानात मालकाने सुरा हातात घेऊन 'तुझे कापू क्या..' असं म्हणताच कोंबडी जोरजोरात मुंडी हलवत आहे. चक्क कोंबडीच 'मला कापू नका' असे म्हणत मुंडी हलवून सांगत आहे. दुकानमालक पुन्हा 'तुझे कापू क्या' असं विचारतो आणि परत कोंबडी तसंच करते. शेवटी दुकानमालकाने ही कोंबडी कापली नाही. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
संपादन - स्नेहल कदम