शिवस्मारकासाठी सांगली जिल्ह्यातून माती, पाणी - पृथ्वीराज देशमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

सांगली - मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकासाठी जिल्ह्यातून माती, पाणी पाठवले जाणार आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यातील विविध ठिकाणांतून माती व पाणी उद्या (ता. २२) शहरात आणली जाणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहराध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘शिवस्मारकाचे भूमिपूजन येत्या २४ ला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी राज्याच्या ज्या भागात शिवरायांचे सानिध्य लाभले तेथून माती व पाणी नेले जाणार आहे. जिल्ह्यात बाणूरगड, जुन्हा पन्हाळा आदी ठिकाणांहून पाणी आणले जाणार आहे. दुपारी १ वाजता जलकलशांचे आगमन मारुती चौकात शिवराजांच्या पुतळ्याजवळ होईल. तेथून मिरवणुकीने ते सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिरात नेले जाईल. तेथे खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत सभा होईल.’’ 

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आज येथे बैठक झाली. आमदार गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क विभागाचे मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, तालुकाप्रमुख आदी उपस्थित होते.

Web Title: soil & water supply for shivsmarak in sangli district