डिजिटल पेमेंटमध्ये देशात 21 वा क्रमांक

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 जुलै ते 31 ऑक्‍टोबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार शंभर टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. 

सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील "डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 21वे मानांकन मिळवले आहे. पहिल्या घोषणेत हा क्रमांक 22 वा होता.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 जुलै ते 31 ऑक्‍टोबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार शंभर टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. 

डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यासाठी संबंधित बॅंकेने सर्वांना एटीएम व डेबीट कार्ड उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाइन डिजिटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे अधिकारी व कर्मचारी आपले आर्थिक व्यवहार 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट पद्धतीने करतील त्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बॅंकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीज बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी ऑनलाइन करता येणार आहे. 

डिजिटल पेमेंटबाबत देशातील मोठ्या शहरांच्या तुलनेत सोलापूरने बाजी मारत पहिल्या क्रमांकाची प्रगती केली व 21 वे मानांकन मिळवले आहे. - शिरीष धनवे, मुख्य लेखापाल

Web Title: solapur 21st in the country of digital payment