"जीपीएस'द्वारे धावणार सोलापूरची परिवहन बस

bus
bus
सोलापूर : परिवहनच्या बसचे लोकेशन प्रवासी आणि परिवहन अधिकाऱ्यांना समजावे, यादृष्टीने सोलापुरातील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांकडून मोबाईल ऍप तयार केले आहे. त्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले असून आता मार्गावरील 30 बसला जीपीएसद्वारे त्याची जोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी, "परिवहन'कडे नादुरुस्त असलेल्या 80 बस दुरुस्तीसाठी महापालिकेकडे 60 लाखांची मागणीही करण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

खासगी वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त असलेली परिवहन व्यवस्था पुन्हा सुधारण्यासाठी नवनवे प्रयोग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांना विविध मार्गावरील दर, बसचा वेळ समजावा, बसचा तांत्रिक बिघाड झाल्यास अथवा विलंब झाल्यास त्याचे कारणही या ऍपमुळे समजू शकणार आहे. प्रवाशांमध्ये विश्‍वास निर्माण झाल्यास शहरात कितीही खासगी रिक्षा असतानाही प्रवाशांचा ओढा परिवहन बसकडेच वाढलेला असेल, असा विश्‍वासही श्री. मल्लाव यांनी व्यक्‍त केला. परिवहन कर्मचारी, पदाधिकारी व महापालिकेने समन्वयाने काम केल्यास निश्‍चितपणे परिवहनला "अच्छे दिन' येतील, असेही ते म्हणाले.


हेही वाचाच...मेगाभरती जानेवारीपर्यंत लांबणीवर !

शहरात निम्म्याने अवैध रिक्षा
खासगी प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षांना अमर्याद परवानगी दिली जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून अथवा शहरातील ऑटो रिक्षा अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करीत आहेत. तरीही शहर वाहतूक पोलिस असो की आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून काणाडोळा केला जात आहे. अशा अवैध रिक्षांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची गरज आहे. जेणेकरून खासगी प्रवासी वाहतूक सुरक्षित होईल. दुसरीकडे महापालिकेची परिवहन व्यवस्थाही सुधारण्यास मदत होईल, असेही अशोक मल्लाव यांनी सांगितले.


हेही वाचाच...पोलिस पाटील भेटणार नुतन मुख्यमंत्र्यांना

श्री. मल्लाव म्हणाले...
- बेस्टकडून पार्ट अथवा बस घेण्यासाठी तेथील परिवहन समिती व महापालिकेला करावा लागेल ठराव
- बेस्ट अथवा पीएमटीकडून जुन्या बस घेण्याऐवजी आपल्याकडील जुन्या बस दुरुस्ती परवडली
- 80 बस दुरुस्तीसाठी महापालिकेने 60 लाखांचे अर्थसहाय करावे : प्रवाशांमध्ये निर्माण होईल विश्‍वास
- परिवहन कर्मचाऱ्यांकडे खासगी प्रवासी वाहतुकीची रिक्षा अथवा वाहन असल्यास होणार कारवाई
- शहरातील अरुंद रस्ते अन्‌ अतिक्रमणामुळे 12 ते 14 मीटरच्या बस धावण्यास अडचणी
- सोलापुरात प्रवाशांची संख्या मोठी असल्याने परिवहनला येतील 'अच्छे दिन'


हेही वाचाच....छानच की...सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार नवे पदवी प्रमाणपत्र


परिवहनची स्थिती
एकूण बस
210
दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील बस
80
दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्च
60 लाख
चेसी क्रॅक बस
100
मार्गावरील बस
30
-
चांगले काम करुनही बदनामी
चांगले पारदर्शक काम करूनही काहीजण बदनामी करतात, असा अनुभव आहे. माझी तब्येत ठीक नसल्याने मला काम करता येणार नाही, असे परिवहन समितीला सांगितले आहे. समितीशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेईन. परिवहन व्यवस्था सुधारण्यास वाव आहे मात्र, काही ठोस बदल करावे लागतील.
- अशोक मल्लाव, परिवहन व्यवस्थापक, सोलापूर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com