पोलिस पाटील भेटणार नुतन मुख्यमंत्र्यांना

तात्या लांडगे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

- चार महिन्यांपासून थकले 94 कोटींचे मानधन
- गावगाड्याची सुरक्षा जपताना आर्थिक गणित विस्कटले
- चार महिन्याला मिळतेय एकदा मानधन
- कोतवालांच्या पदोन्नतीचा शासन निर्णय होऊनही मिळेना पदोन्नती

सोलापूर : गावोगावी शांतता, सुव्यवस्थेसाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिस पाटलांना त्यांच्या कामाचे मोल मिळण्यासाठी चार-चार महिन्यांची वाट पाहावी लागत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील मानधन एकदम मिळाले. त्यानंतर मात्र, राज्यातील 36 हजार पोलिस पाटलांचे ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतचे सुमारे 94 कोटींचे मानधन मिळालेले नाही. नियमित मानधनासाठी पोलिस पाटील संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडणार आहेत.

हेही वाचाच...

aschim-maharashtra/wellstudents-will-get-new-degree-certificate-first-time-243730">छानच की...सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच नवे पदवी प्रमाणपत्र

पोलिस प्रशासनाला गावोगावच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी मदत करणारा महत्त्वाचा घटक म्हणून पोलिस पाटलांची ओळख आहे. तंटामुक्‍त गाव करण्यात पोलिस पाटलांचे महत्त्व मोठे आहे. साडेसहा हजार रुपयांच्या मानधनावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या राज्यातील पोलिस पाटलांना चार महिने मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्षापूर्वी राज्यातील 18 हजार पोलिस पाटलांची नव्याने नियुक्‍ती करण्यात आली. त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली. आपल्या गावाला तंटामुक्‍त करायचे, गावातील भांडणे गावातच मिटायला हवीत, पोलिसांवरील ताण कमी व्हावा यादृष्टीने पोलिस पाटलांनी आपल्या स्तरावरूनच नियोजन केले. बहुतांश गावे पोलिस पाटलांच्या माध्यमातून तंटामुक्‍तही झाली. काही गावांमध्ये कायमस्वरूपी दारूबंदीही झाली. मात्र, त्याच पोलिस पाटलांना महिन्याला मानधनाची अपेक्षा असतानाही निधीअभावी पोलिस पाटलांना वेळेवर दरमहा मानधन मिळत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचाच...'हा' भाजप नेता दाखल करणारा अब्रुनुकसानीचा दावा

राज्याची स्थिती
एकूण पोलिस पाटील
36,200
दरमहा मानधनाची रक्‍कम
23.53 लाख
मानधनाची प्रलंबित रक्‍कम
94.12 कोटी

हेही वाचाच...कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडला

कोतवालांना पदोन्नतीची प्रतीक्षा
कोतवालांच्या एकूण रिक्‍त पदांच्या 40 टक्‍के जागा पदोन्नतीने भराव्यात. पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कोतवालांना शिपाई पदावर पदोन्नतीने नियुक्‍ती करावी, असा शासन निर्णय झाला. दरम्यान, तोपर्यंत पदोन्नतीस पात्र असलेल्यांना दरमहा 15 हजार रुपयांचे मानधन द्यावे, असाही निर्णय झाला होता. राज्यातील एकूण 12 हजार 648 कोतवालांपैकी दोन हजार 700 कोतवाल पदोन्नतीसाठी पात्र आहेत. मात्र, त्यांना एक वर्षापासून त्याची अंमलबजावणी झालीच नाही. पदोन्नतीही नाही आणि 15 हजारांचे मानधनही मिळेना, अशी स्थिती असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Patil to meet new chief minister