नियुक्त कार्यालयातच 'थंब' करण्याचे सोलापूर मनपा आयुक्तांचे आदेश 

sakal_news_impact
sakal_news_impact

सोलापूर - ज्या कार्यालयात नियुक्ती आहे, त्याच कार्यालयात "बायोमेट्रिक थंब' करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी दिला. त्याच वेळी, नियुक्त कार्यालय वगळता इतर ठिकाणी थंब केलेल्यांची माहिती पाठविण्याची सूचनाही संगणक विभागाला केली आहे. 

महापालिकेचे कर्मचारी सोयीच्या कार्यालयात "थंब' करीत असल्याने सुविधेचा बोजवारा उडाल्याची बातमी गुरुवारी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नियुक्त कार्यालयात जाऊन थंब केले. आयुक्तांनी तातडीने संगणक विभागाच्या प्रमुखांना कार्यालयात बोलावून घेतले. ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या आवारातील कार्यालयात आहे, मात्र थंब मात्र इतरत्र झाले आहेत, अशांची यादी सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार संगणक विभागातील कर्मचारी यादी बनविण्याच्या कामाला लागले आहेत. 

कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी जावे लागते. ते सकाळीच कामासाठी बाहेर पडतात. ज्यांची घरे सोरेगाव, शेळगी किंवा हद्दवाढ भागातील लांबच्या ठिकाणी आहेत, त्यांनी परिसरातील कार्यालयात थंब करण्यास हरकत नाही. मात्र ज्यांची घरे महापालिकेच्या काही अंतरावर आहेत, ते कर्मचारीही घराजवळच्या कार्यालयात जाऊन थंब करीत आहेत. त्यामुळे ते खरोखरच कामावर असतात का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी विभागीय कार्यालयात जाऊन "थंब' करत असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक, या कर्मचाऱ्यांसाठी सर्व जलशुद्धीकरण केंद्र किंवा पंपहाउसवर "थंब'ची व्यवस्था करण्यात आली आहे. मग विभागीय कार्यालयात थंब केलेले हे कर्मचारी जातात कुठे, असा प्रश्‍नही उपस्थित होऊ लागला आहे. आता आयुक्तांनीच आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना नियुक्त कार्यालयातच जाऊन थंब करावे लागणार आहे. 

...तर विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई 
महापालिकेत नियुक्ती असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याने विभागीय कार्यालयात थंब केले, तर त्यासाठी संबंधित विभागीय अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे. इतर कार्यालयातील कोणालाही थंब करू देऊ नये, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे. सूचना देऊनही कुणी थंब करत असेल तर त्याची माहिती तातडीने आयुक्त कार्यालयास कळविण्यास सांगितले आहे. दरम्यान, एखाद्या कर्मचाऱ्याला बाहेरील कार्यालयात थंब करावे लागले तर त्याचे कारण काय, याची नोंद करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com