सोलापूर जिल्हा बॅंकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

या कार्यक्रमात " शताब्दी अर्थक्रांतीची" या स्मरणिकेचे प्रकाशन श्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. काही माजी अध्यक्षांचा सन्मानही करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणारे साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायटी, सूत गिरण्याचे अध्यक्ष तसेच ठेवीदार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे

सोलापूर - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा समारोप शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजता येथील पार्क मैदानावर  होणार आहे.

माजी केंद्रीय कृषी मंत्री व खासदार शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी सहकार मंत्री सुभाष देशमुख असतील अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष जयवंतराव जगताप उपस्थित होते. 

या कार्यक्रमात " शताब्दी अर्थक्रांतीची" या स्मरणिकेचे प्रकाशन श्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. काही माजी अध्यक्षांचा सन्मानही करण्यात येणार आहे. नियमित कर्जफेड करणारे साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायटी, सूत गिरण्याचे अध्यक्ष तसेच ठेवीदार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे , असेही श्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: solapur district bank anniversary