सोलापूर महापालिकेत नाशिकची पुनरावृती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

महापालिका सभापती पदाचा वाद न्याय प्रविष्ट आहे. त्यावर आता ३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षनेते संजय कोळी व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या समवेत आयुक्तांची भेट घेतली

सोलापूर - स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. 

 अशीच स्थिती असल्याने  नाशिक महापालिकेचे  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट सभेत अंदाजपत्रक सादर केले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होण्याची शक्यता आहे.

महापालिका सभापती पदाचा वाद न्याय प्रविष्ट आहे. त्यावर आता ३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षनेते संजय कोळी व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांच्या समवेत आयुक्तांची भेट घेतली. निकाल वेळेत नाही लागला तर बजेटची अडचण होवू शकते.  त्यामुळे ३५ अ नुसार बजेट थेट सभेकडे पाठवावे अशी सूचना केली. त्यानुसार बजेट सभेकडे येण्याची शक्यता आहे.

Web Title: solapur to follow Nashik's footsteps