सोलापुर : लालपरी अता आकर्षक रंगात दाखल 

दावल इनामदार
सोमवार, 3 डिसेंबर 2018

ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा आगाराकडे स्टील बॉडीच्या दिमाखदार दोन बसेस नव्याने दाखल झाल्या असून, या बसेसमध्ये बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवासासाठी त्या आरामदायी वाटत असल्यामुळे प्रवाशांचा ओढा त्या बसकडे वाढला आहे. 

ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा आगाराकडे स्टील बॉडीच्या दिमाखदार दोन बसेस नव्याने दाखल झाल्या असून, या बसेसमध्ये बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवासासाठी त्या आरामदायी वाटत असल्यामुळे प्रवाशांचा ओढा त्या बसकडे वाढला आहे. 

दरम्यान, यंदा दुष्काळामुळे प्रवाशांची संख्या घट झाल्याने मंगळवेढा आगारालाही यावर्षी कार्तिकी वारीचा दुष्काळाचा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून मंगळवेढा आगारास नव्याने 100 टक्के स्टील बॉडीच्या दोन बसेस आल्या आहेत. या गाडीची उंची व लांबी इतर एसटी बसेसच्या तुलनेने दोन फुट जादा आहे. परिणामी यामुळे गाडी आदळत नाही, गाडीतील बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होत असल्याचे एसटीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. 

या गाडीमध्ये 42 प्रवासी बसण्याची व्यवस्था असून इतर नेहमीच्या गाड्यांमध्ये 44 प्रवाशांची आसनव्यवस्था आहे. स्टील बॉडीच्या गाड्या स्पर्धेच्या युगात खाजगी ट्रॅव्हल्सप्रमाणे आकर्षक रंगात दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांचा ओढा या गाड्याकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या आगरात दोन गाड्या पुणे व सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा सोयीसाठी धावत आहेत. प्रवाशांचे साहित्य ठेवण्याची व्यवस्था पाठीमागील व साईटच्या कप्यात केलेली असल्यामुळे प्रवाशांना बसच्या वर चढणे व उतरणे हे टळले आहे.तसेच बसला एल.ई.डी. फलक असल्यामुळे प्रवाशांना सहजरित्या कुठल्या मार्गावरील गावाला बस चालली आहे हे दुरच्या अंतरावरूनही स्पष्टपणे दिसते. यापूर्वी जुन्या गाड्यांना स्टेपनी बसच्या टपावर ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे वाहनचालकास स्टेपनी बदलण्यास अधिक वेळ, रात्रीच्या वेळी नाहक त्रास वाहन चालकाना होत होता.  या स्टील बॉडी गाडीमध्ये गाडीच्याखाली स्टेपनी ठेवण्याची व्यवस्था केली आहे. वाहनचालकाकडून उत्साह व्यक्त करीत आहे या नव्याने दाखल झालेल्या बसेसचे दर इतर गाड्यांप्रमाणेच असल्याचे आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी सांगितले.  

सध्या मंगळवेढा आगाराकडे 64 गाड्या आहेत. मात्र त्या तुलनेने चालक-वाहकाची संख्या अपुरी पडत असल्याने वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडताना मोठी कसरत करावी लागत आहे. आगाराकडे सध्या 15 चालक व 15 वाहकांची संख्या कमी पडत आहे. सध्या स्टील बॉडीच्या या बसेसना प्रवाशी वर्गाचा चांगला प्रतिसाद असून खासगी ट्रैव्हल्सप्रमाणे धड़धाकट असून रुबाबदार आहेत.

"शंभर टक्के स्टील बॉडीच्या दोन आरामदायी बस आगाराकडे आल्या आहेत पुणे व सोलापूर मार्गावर या गाड्या धावत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर बसेसप्रमाणेच या बसेसचे तिकीट दर असल्यामुळे या गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा."
- मधुरा जाधवर, आगारप्रमुख, मंगळवेढा आगार

Web Title: Solapur: Lalpari is now in Attractive Coloring