सायकल रॅलीतून रस्ता सुरक्षेचा जागर

परशुराम कोकणे
शनिवार, 19 मे 2018

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलिस, सीएनएस हॉस्पिटल, इको फ्रेंडली क्लब संचलित इको सायकल क्लब आणि वारी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली आहे. 

सोलापूर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त सोलापूर ते मंगळवेढा दरम्यान सायकल रॅलीला आज सकाळी सुरुवात झाली. रॅलीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबद्दल प्रबोधन व जनजागृती करण्यात येत आहे. 

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलिस, सीएनएस हॉस्पिटल, इको फ्रेंडली क्लब संचलित इको सायकल क्लब आणि वारी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली आहे. 

आज शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सोलापुरातील सीएनएस हॉस्पिटल येथून या रॅलीचा शुभारंभ झाला. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, सीएनएस रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रसन्न कासेगावकर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष काणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार, संयोजक प्रा. सारंग तारे, अमेय केत, डॉ. अरुंधती हराळकर, भाऊराव भोसले, गणेश शिलेदार,  यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या रॅलीत विद्यार्थी, महिलांसह विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी झाली आहेत. दुपारी 12 वाजता मंगळवेढ्यात या रॅलीचे स्वागत होणार आहे.

Web Title: Solapur to Mangalwedha cycle rally