सोलापुरच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

बनशेट्टी यांना 49, तर शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना 21 मते मिळाली. त्या खालोखाल कॉंग्रेसच्या प्रिया माने यांना 18 मते मिळाली.

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या 37 व्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांचा 28 मतानी पराभव केला.

बनशेट्टी यांना 49, तर शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना 21 मते मिळाली. त्या खालोखाल कॉंग्रेसच्या प्रिया माने यांना 18 मते मिळाली. एमआयएमच्या नूतन गायकवाड यांनी माघार घेतली. एमआयएम, बहुजन समाज पक्ष व माकपचे नगरसेवक तटस्थ राहिले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

एकाच घरातील दोन महापौर होण्याची दुसरी वेळ
भाजप नगरसेविका शोभा बनशेट्टी यांच्या रूपाने सोलापूर पुण्यनगरीचे
महापौरपद एकाच घरात दुसऱ्यांदा जाण्याची ही दुसरी वेळ आहे. बनशेट्टी
यांचे आजेसासरे विश्वनाथ बनशेट्टी हे 1971 मध्ये तत्कालीन प्रभाग आठमधूनच
निवडून येऊन महापौर झाले होते. आता तब्बल 46 वर्षानंतर त्यांच्या नातसून
बनशेट्टी यांनीही आताच्या प्रभाग 8 मधून निवडून येत महापौरपदाचा बहुमान
मिळवला आहे. विश्वनाथ बनशेट्टी यांनी सलग 50 वर्षे नगरसेवकपदी निवडून येत
विक्रम केला होता. तर बनशेट्टी या सलग चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.
बनशेट्टी परिवाराशिवाय, दिवंगत माजी आमदार बाबूराव चाकोते यानी 1973-74
मध्ये तर त्यांचे पुत्र माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी 1992-93 मध्ये
महापौर होण्याचा बहुमान मिळवला होता.

Web Title: Solapur mayor bjp Shobha Banshetti