सोलापूरमध्ये आई-मुलाची हत्या; पत्नीला पेटवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सोलापूर- कोरफळे (ता बार्शी) येथे अनुरुथ बरडे आई व मुलाची झोपेत असताना खून करून पत्नीला पेटवून दिले. दोन मुलांवर सुरीने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (ता. 8) मध्यरात्री ही घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

अनुरुथ बरडे याने रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणा वरुन झोपेत असलेली आई सखुबाई बरडे (वय 65), मुलगा सुदर्शन बरडे (वय 13) यांच्या डोक्यात दगड फोडायचा घन घालत मारुन टाकले.  दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेली पत्नी रेश्मा बरडे हिला पेटवून दिले व याच खोलीत झोपलेला दुसरा मुलगा अविनाश (वय 9) व प्रतीक्षा (वय 11) यांच्यावर सुरीने वार केले. या घटनेत दोन्ही मुले गंभीर जखमी झाले आहेत. पत्नी रेश्मा हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सुरीचे वार झाल्याने जखमी असलेल्या दोन्ही मुलांवर उपचार सुरु आहेत.  

या घटनेत आरोपी अनुरथही भाजल्याने जखमी झाला आहे. घरातील लोकांची हत्या केल्या नंतर तो सकाळी सहा पर्यंत दारातच बसून राहिला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेउन उपचारासाठी पाठवले आहे. या घटनेने संपूर्ण बार्शी तालुका हादरुन गेला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नही.

Web Title: solapur: mother, child and wife killed